Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिळदार शरीरयष्टीकरिता करण सूचकचे आमिरच्या पावलावर पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 14:53 IST

चांगले दिसायला कोणाला आवडत नाही? विशेषतः अभिनेत्याकरिता, ज्याला नेहमीच ऑनस्क्रीन चांगले दिसावे लागते. कोणतेही पात्र रंगविण्यासाठी आमिर खानची मेहनत ...

चांगले दिसायला कोणाला आवडत नाही? विशेषतः अभिनेत्याकरिता, ज्याला नेहमीच ऑनस्क्रीन चांगले दिसावे लागते. कोणतेही पात्र रंगविण्यासाठी आमिर खानची मेहनत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आगामी मालिका ‘मेरी हानिकारक बीवी’ मधील अखिलेश पांडेची भूमिका निभावणार्‍या अभिनेता करण सूचकने त्याच्याच पावलावर पाऊल टाकायचे सध्या ठरवले आहे. नेहमीच्या भूमिकेला तडा देणार्‍या गजिनी आणि दंगलमधील पात्राकरिता आमिरने बनवलेल्या पिळदार शरीराप्रमाणेच, करणदेखील योग्य आहार आणि व्यायाम करून तसेच करत आहे. करण अखिलेश नावाच्या एका पिळदार शरीराच्या साधा पण मजबूत मुलाची भूमिका तो साकारत आहे आणि त्या भूमिकेसाठी अशा शरीराची गरज आहे. करणने हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्याचे परिणाम आता प्रत्येकजण पाहतोच आहे. मात्र, हे सोपे नव्हते.रोज दोन तास व्यायाम करण्याव्यतिरिक्त, करण काटेकोर आहार पाळत असून महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याने मीठ आणि साखर पूर्णतः बंद केले आहे. मालिकेतील करणचा लुक हा अतिशय सुंदर असून असे शरीर मिळविण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि गाळलेला घाम दिसून येत आहे. अशी वेळ एकदा आली होती की, जेव्हा त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते पण, त्याने धैर्याने हे नकारात्मक विचार झाडून टाकले आणि एकावेळी एक पाऊल अशा तर्‍हेने पुढे आला.करणने सांगितले, “स्वतःसाठी चांगले काम करावे असे कोणाला वाटत नाही? हे लक्षात ठेऊनच, कामाप्रती समर्पण, शिस्त, कठोर परिश्रम आणि बांधिलकीच मला इथपर्यंत घेऊन आली आहे. मला विश्वास आहे की, जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर काहीही करू शकता.तुमच्या क्षमतेला कोणत्याही मर्यादा येत नाहीत.” तो पुढे असेही म्हणाला, “लागोलागच्या शूटिंगमुळे बर्‍याचदा हे खूप दगदगीचे होते, पण धीर धरल्यानेच सर्व नीट होते. त्यामुळे कर्म करत राहा फळ मिळतेच.” अखिलेश आणि त्याच्या आयुष्याशी जोडली गेलेली डॉ. ईरा यांच्याभोवती फिरणारी कथा आणि सुंदर पात्रांचा संगम असणारी नसबंदीच्या संकल्पनेवरील मेरी हानिकारक बीवी ही मालिका आहे.