Join us

फॅन्ससाठी करण मेहरा परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 11:50 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱया करण मेहराने मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या टीआरपीवर फरक पडेल असे ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱया करण मेहराने मालिका सोडल्यानंतर मालिकेच्या टीआरपीवर फरक पडेल असे म्हटले जात होते. या मालिकेत करणने परत यावे अशी प्रेक्षकांकडून मागणी होत होती. करणच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. करण ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत परतणार आहे. करणने त्याच्या तब्येतीच्या कारणावरून मालिका सोडली होती. पण करण लवकरच काही महत्त्वाच्या दृश्यांसाठी चित्रीकरण करणार आहे. त्याने प्रोडक्शन हाऊसला चित्रीकरणासाठी दोन दिवस दिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नैतिक-अक्षराची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.