Join us

करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर अमेरिकेत साजरा करतायेत व्हेलेंटाईन डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 12:28 IST

अभिनेता करण कुंद्रा आणि व्हीजे अनुष्का दांडेकर गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी त्यांचे नाते कधीच मीडियापासून लपवून ठेवले ...

अभिनेता करण कुंद्रा आणि व्हीजे अनुष्का दांडेकर गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी त्यांचे नाते कधीच मीडियापासून लपवून ठेवले नाही. करण आणि अनुष्काचे कपल त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. त्यामुळे ते त्यांच्या फॅन्ससाठी नेहमीच त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते दोघे सध्या एमटिव्हीवरील लव्ह स्कूल सिझन 2 या कार्यक्रमातही झळकत आहेत. या कार्यक्रमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणातून वेळ काढून सध्या ते दोघे व्हेकेशनला गेले आहेत. गेल्या 10-15 दिवसांपासून ते रोमँटिक ट्रिपवर गेले आहेत आणि त्यांच्या या ट्रीपचे विविध फोटो ते पोस्ट करत आहेत. खरे तर व्हेलेंटाईन डे हा कपल्ससाठी खूपच स्पेशल असतो. त्यामुळे हे दोघेदेखील आपला हा दिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करत आहेत. ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हा स्पेशल दिवस साजरा करत असून या स्पेशल दिवसाचे फोटो त्यांनी त्यांच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करणने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी आणि अनुष्का अमेरिकेत आमचा हा स्पेशल दिवस साजरा करत आहोत. आमच्यातील प्रेमाचा ओलावा ताजा राखण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा व्हेलेंटाईन दिवस असतो. त्यामुळेच आम्ही प्रत्येक दिवस व्हेलेंटाईन दिनासारखाच सेलिब्रेट करतो आणि हीच गोष्ट आम्ही एमटीव्ही लव्ह स्कूलच्या कपल्सनादेखील सांगत असतो. प्रत्येक कपलने त्यांच्यातील प्रेम सदैव ताजे ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. मला अनुष्कासोबत फिरायला, वेळ घालवायला खूप आवडतो आणि त्यामुळे सध्या चित्रीकरणातून वेळ काढून आम्ही अमेरिकेत फिरत आहोत.