आप के आ जाने से मध्ये करण जोतवानीने गायले रणबीर कपूरचे गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:13 IST
आपल्या आवडत्या सिताऱ्यांकडून मेथड अॅक्टिंग शिकणे किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेणे यावरून काही अगदी कठीण प्रसंगांसाठीही ते तयार होतात. अभिनेता ...
आप के आ जाने से मध्ये करण जोतवानीने गायले रणबीर कपूरचे गाणं
आपल्या आवडत्या सिताऱ्यांकडून मेथड अॅक्टिंग शिकणे किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेणे यावरून काही अगदी कठीण प्रसंगांसाठीही ते तयार होतात. अभिनेता करण जोतवानी झी टीव्हीवरील आप के आ जाने से मध्ये साहिलची भूमिका करत आहे. नुकतेच एका दृश्यासाठी त्याला बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ऐ दिल है मुश्किलच्या टायटल ट्रॅकवर परफॉर्म करायचे होते. करण रणबीर कपूरचा मोठा चाहता असून ऑनस्क्रीन रणबीरचे गाणे साकारायला मिळणार ह्या कल्पनेनेच तो खुश होता. हा परफॉर्मन्स अगदी सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी त्याने रणबीरचे ह्या चित्रपटातील हावभावांचे निरीक्षण केले आणि मनातल्या मनात रणबीरची व्यक्तिरेखा अयानची व्यक्तिरेखा बनवली.ह्या शोमधील ट्रॅकनुसार साहिल (करण जोतवानी) वेदिका (सुहासी धामी) च्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहे. तिचा साधेपणा आणि चांगुलपणा पाहून तो तिच्या हळूहळू प्रेमात पडतो. ह्या शो च्या आगामी भागांमध्ये निधी ( शैली प्रिया) साहिलला त्याच्या वाढदिवशी गाण्यासाठी आणि रणबीर कपूरचे ऐ दिल है मुश्किल वर परफॉर्म करायला सांगते. वेदिकाला खास वाटावे म्हणून ते गीत तो तिला अर्पण करतो आणि त्यासमयी उपस्थित असलेले सगळेच थक्क होतात. ह्यावर करण जोतवानी म्हणाला, “रणबीर कपूर माझा लाडका अभिनेता आहे. तो इंडस्ट्रीमधील सर्वांत हुशार अभिनेता आहे़ त्याचे डोळे अतिशय बोलके आहेत आणि त्यांच्या अभिनयपद्धतीने मी अतिशय प्रेरित झालो आहे. जेव्हा मला कळले की मी ऐ दिल है मुश्किल ह्या गाण्यावर परफॉर्म करायचे आहे तेव्हा मला खूप आनंद झाला कारण ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे दृश्य चित्रीत करताना मला खूप मजा आली आणि ही माझी रणबीर कपूरला दिलेली छोटीशी आदरांजली आहे. त्याच्यासारखाचा परफॉर्मन्स देण्यासाठी मी ह्या चित्रपटातील त्याच्या हावभावांचे खूप जवळून निरीक्षण केले.”