करण जोहरला निर्माता बनायचे नव्हते तर या क्षेत्रात करायचे होते करियर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:07 IST
मोठेपणी आपण कोण होणार, याचे अनेक पर्याय आपण लहान असताना ठरविलेले असतात; परंतु शेवटी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते ...
करण जोहरला निर्माता बनायचे नव्हते तर या क्षेत्रात करायचे होते करियर
मोठेपणी आपण कोण होणार, याचे अनेक पर्याय आपण लहान असताना ठरविलेले असतात; परंतु शेवटी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण आपल्याला सर्वाधिक पसंत असलेल्या क्षेत्राचीच निवड करतो. सर्वच लहान मुलांप्रमाणे नामवंत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही मोठेपणी कोण व्हायचे, याचे बरेच पर्याय निवडले होते. टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमात करण जोहरने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख खान करतो. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम वगैरे अनेक सुपरहिट चित्रपटांचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ कार्यक्रमात त्याच्या एका सिक्रेटविषयी सगळ्यांना सांगितले. तो लहान असताना त्याला काय व्हायचं होते याची त्याने यादीच बनवली होती. त्याच्या हस्ताक्षरातील ही यादी त्याने या कार्यक्रमात सादर केली. त्याने ही यादी त्याची मुले यश आणि रूही यांना देखील दाखवली आहे. याविषयी करणने सांगितले, “मी चार वर्षांचा असताना मला हेअर स्टायलिस्ट व्हायचे होते, दहा वर्षांचा असताना मला डान्सर व्हायचे होते, १५ वर्षांचा झाल्यावर मला जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटिंग करण्याची इच्छा होती. १८ व्या वर्षी मी फॅशन डिझायनर होण्याचे निश्चित केले होते आणि शेवटी २० व्या वर्षी मी चित्रपट निर्माता होण्याचा निर्णय घेतला.” ही यादी वाचून दाखविताना तो म्हणाला, “माझे हे विविध क्षेत्रांतील करिअरचे पर्याय पाहिल्यावरही माझ्या वडिलांनी प्रत्येक वेळी मला पूर्ण पाठिंबा दिला, ज्याचं मला फार आश्चर्य वाटतं.”टेड टॉक्स या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नव्या संकल्पना आणि सिद्धांत मांडतात. परंतु ‘टेड टॉक परिषदां’पेक्षा हा कार्यक्रम वेगळा आहे. त्या परिषदांचे प्रसारण कंपनीतर्फे केले जाते आणि ते टीव्ही कार्यक्रम म्हणून गणले जात नाहीत. शाहरूखचा कार्यक्रम हा या कंपनीने खास टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेला पहिलाच कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. Also Read : करण जोहरने टेड टॉक्स इंडिया या कार्यक्रमात लिहिले आपल्या मुलांना पत्र