Join us

करण जोहरने नेपोटिझमवरील वाद संपवला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:32 IST

आलिया भट्ट, वरूण धवन असे काही उत्तम कलाकार बॉलिवूडला दिल्याबद्दल त्याला बॉलिवूडमधील फ्लॅगबेअरर ऑफ नेपोटिझम असा खिताब मिळाला. बॉलिवूडमधील ...

आलिया भट्ट, वरूण धवन असे काही उत्तम कलाकार बॉलिवूडला दिल्याबद्दल त्याला बॉलिवूडमधील फ्लॅगबेअरर ऑफ नेपोटिझम असा खिताब मिळाला. बॉलिवूडमधील नवीन कलाकारांच्या प्रवेशाबद्दलच्या वर्षभर सुरू असलेला वाद आणि स्टार किड्‌सना मिळणारी वागणूक यांबाबतीत नेपोटिझमबद्दलचे संवाद आता मागे पडायला लागले आहे.छोट्या पडद्यावर आगामी 'इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार' ह्या शोसह करण जोहरने ह्या वादावर पडदा टाकला आहे.करण जोहरला आपल्या आगामी प्रोजेक्ट्‌ससाठी नव्या चेहऱ्यांचा शोध असून त्याच्या अंतिम निर्णयामध्ये ''ना खानदान ना सिफारिश चालणार'' असे त्याने स्पष्ट केले आहे.करण जोहर आणि रोहित शेट्टी हे ह्या शोचे परीक्षण करतील आणि नेपोटिझमबद्दलचा कलाकार आणि प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करतली. करणने याविषयी सांगितले की,हा शो सामान्य लोकांना त्यांची कला दाखवण्यासाठी एक मंच प्रदान करत असून आपल्या प्रकारच्या ह्या वेगळ्‌या रिॲलिटी शोमध्ये विजेत्याला थेट बॉलिवूडचे दरवाजे खुले होतील.त्यामुळे तो कोण्या एका बड्या स्टार्सचा मुलगा आहे किंवा त्याची कोणी सिफारिश केली आहे. या गोष्टी या शोमध्ये नसतील त्यामुळे फक्त आणि फक्त टॅलेंटच्याच जोरावर त्याला पुढे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची संधी दिली जाणार आहे.Also Read:करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु 'इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स'शोचे करणार सूत्रसंचालन!अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अरमान मलिक लवकरच छोट्‌या पडद्यावर एंट्री करणार आहेत.आगामी शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये त्याची बंगाली बाला बिपाशा बासुसोबत येणार आहे.करण सिंग ग्रोव्हर छोट्‌या पडद्यावर लोकप्रिय झाला आणि मग त्याने चित्रपटांकडे लक्ष वळवले.आता कदाचित इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सचे सूत्रसंचालन करण्यासाठी तो टेलिव्हिजनवर परतणार आहे.एवढेच नाही तर बिपाशा बासुचे हे छोट्‌या पडद्यावरील पदार्पण असेल.सूत्रांनुसार,करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांना विचारण्यात आले आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.हा शो आपल्या इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स देणार असून त्यांचे ग्रूमिंग खुद्द बॉलिवूचे दिग्गज  बिगीज करण जोहर आणि रोहित शेट्टी करतील.करणने जरा नचके दिखा,आयडिया रॉक्स इंडिया, पॉवर कपल इत्यादी शोज्‌चे सूत्रसंचालन केले असून त्यांचे #MonkeyLove छोट्‌या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.