Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिलच्या शोमध्ये ए.आर.रहमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:14 IST

ए.आर.रहमान हे नेहमीच प्रसिद्धझोतापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये ते कधीही झळकत नाहीत. पण कपिल शर्माच्या ...

ए.आर.रहमान हे नेहमीच प्रसिद्धझोतापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये ते कधीही झळकत नाहीत. पण कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये ते लवकरच हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाची क्रिएटिव्ह हेड प्रीती सीमोसने ही बातमी ट्विटरद्वारे दिली आहे. ए.आर.रहमान आमच्या कार्यक्रमात येणे म्हणजे आमचे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच आहे या शब्दांत प्रीतीने आपला आनंद व्यक्त केला आहे. तर कपिलने चित्रीकरणासाठी मी खूप नर्व्हस आणि उत्साही असल्याचे ट्वीट केले आहे. ए.आर.रहमानच्या फॅन्ससाठी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा हा भाग ही एक पर्वणीच ठरणार आहे.