Join us

कपिलच्या शोला ‘ती’ करणार टाटा-बाय बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:24 IST

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सरला हे पात्र साकारणारी सिमोना चक्रवर्ती या शोला टाटा-बाय बाय करण्याच्या विचारात आहे. या शोमध्ये ...

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सरला हे पात्र साकारणारी सिमोना चक्रवर्ती या शोला टाटा-बाय बाय करण्याच्या विचारात आहे. या शोमध्ये देण्यात आलेल्या पात्राबाबत सिमोना समाधानी नसल्याचं बोललं जातंय. कॉमेडी नाईट विथ कपिल या आधीच्या शोमध्ये सिमोना कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत होती. मात्र आता नव्या शोमध्ये सिमोना डॉक्टर असलेल्या सुनील ग्रोव्हरच्या मुलीची म्हणजेच सरला ही भूमिका साकारतेय. ही सरला कपिलवर लट्टू असल्याचं दाखवण्यात आलंय. सिमोनानं आजवर अनेक टीव्ही मालिका आणि शोमध्ये काम केलंय. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती कपिलच्या पत्नीच्या भूमिकेमुळं त्यामुळं तिची आताची नाराजी साहजिकच असं म्हटल्यास वावगं ठरु नये.