तर 'या' व्यक्तिमुळे बंद झाला कपिल शर्माचा शो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 12:44 IST
नुकताच स्टार कॉमेडियन कपिल शर्माचा शो बंद करण्यात आला आहे. सोनी टीव्हीने कपिलचा शो बंद करण्यामागे शो मध्ये बदल ...
तर 'या' व्यक्तिमुळे बंद झाला कपिल शर्माचा शो!
नुकताच स्टार कॉमेडियन कपिल शर्माचा शो बंद करण्यात आला आहे. सोनी टीव्हीने कपिलचा शो बंद करण्यामागे शो मध्ये बदल करणे आणि कपिलला आराम देण्यासाठी थोडे दिवस बंद करण्यात आल्याचे कारण सांगितले. मात्र आता एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळते आहे. शो बंद होण्यामागे कपिलचा मित्र आणि चित्रपट फिरंगीचा दिग्दर्शक राजीव ढींगरा आहे. सुनील ग्रोवरशी झालेल्या भांडणानंतर सुनीलसह, अली असगर, सुंगधा मिश्रा आणि कपिलची कथित एक्स गर्लफ्रेंड शोची क्रिएटिव्ह हेड प्रीती सिमोस हा शो सोडून गेली. यानंतर शोची टीआरपी सतत कमी होत गेली. प्रीतीनंतर शोचा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून राजीव ढींगराला घेण्यात आले. मात्र ऐकण्यात येतेय राजीव टीमला कंट्रोल करु शकला नाही. स्क्रिप्ट वेळेवर तयार व्हायची नाही, कामाची डेडलाईन वेळेत पूर्ण व्हायची नाही त्यामुळे शोची टीआरपी अजून ढासळली. टीमच्या लोकांना राजीव अजिबात आवडायचा नाही. मात्र तरीही कपिलची इच्छा होती राजीवने शोचे दिग्दर्शन करावे. ALSO READ : कपिल शर्माने द कपिल शर्मा शो बंद होण्याबद्दल दिली पहिली प्रतिक्रियाशो बंद झाल्यानंतर कपिलने माध्यमांना दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान सांगितले होते की,'' माझी तब्येत सतत बिगडत असल्यामुळे काही वेळेसाठी शोने ब्रेक घेतला आहे. डॉक्टरांनी मला काही काळ आराम करायला सांगितला आहे. त्यामुळे मी चॅनलचे आभार मनतो त्यांनी मला केलेल्या सर्पोटसाठी. आमचा शो पूर्णपणे बंद झालेला नाही काही वेळेसाठी ब्रेक घेतला आहे. लवकरच आम्ही परतणार आहोत.'' अनेक वेळा बॉलिवूड सेलिब्रेटींना येऊऩ कपिलच्या शोवरुन शूट केल्याविनाच परतावे लागले होते. शाहरुख खान, अजय देवगण, अनिल कपूर हे शूट केल्याविनाच परतले होते.