Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कपिल शर्माचं आधी लग्न कोंढाण्याचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:22 IST

कॉमेडियन कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील रसिकांचं मनोरंजन करतोय. त्यांना खळखळून हसवतोय. मात्र या हसणा-या चेह-यामागंही एक दुःख होतं. ज्या ...

कॉमेडियन कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील रसिकांचं मनोरंजन करतोय. त्यांना खळखळून हसवतोय. मात्र या हसणा-या चेह-यामागंही एक दुःख होतं. ज्या दुखण्याची कपिलनं कुणालाही पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. कारण नुकतंच कपिल शर्माच्या मानेची छोटीशी सर्जरी झालीय. द कपिल शर्मा शोच्या गेल्या भागात कपिलनं अभिनेता गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांसह तुफान धम्माल मस्ती केली. ज्या दिवशी या भागाचं शूटिंग होतं, त्याच दिवशी कपिल मानेच्या दुखण्यानं हैराण होतं.. याच मानेवर सर्जरीचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता.. मात्र त्याच दिवशी गोविंदा, त्याची आणि मुलगी शोमध्ये येणार होते. ब-याच दिवसानंतर गोविंदाच्या तारखा मिळाल्यानं कपिलला ही संधी चुकवायची नव्हती.त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर कपिलनं आधी गोविंदाचा सहभाग असलेल्या शोचं शूटिंग पूर्ण केलं. यानंतरच त्यानं आपल्या मानेवर सर्जरी केली. आधी लग्न कोंढाण्याचं याप्रमाणे आधी काम नंतर सारं काही या कपिलच्या वृत्तीचं कौतुक तर व्हायलाच हवं.