कपिल शर्मा ‘कॉमेडी शो मध्ये दिसेल नव्या लुकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 15:19 IST
कॉमेडियन कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ हिट झाला आहे. नुकतीच या शोमध्ये ‘बुआ’ म्हणजेच उपासना सिंहची इंट्री ...
कपिल शर्मा ‘कॉमेडी शो मध्ये दिसेल नव्या लुकमध्ये
कॉमेडियन कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ हिट झाला आहे. नुकतीच या शोमध्ये ‘बुआ’ म्हणजेच उपासना सिंहची इंट्री झाली होती. आता दर्शकांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी अशी आहे की, कपिल शो मध्ये डबल रोलमध्ये दिसेल आणि आणि तो ही नव्या लुकमध्ये. सध्या कपिल कप्पूची भूमिका निभवतोय.आता लवकरच दर्शकांना ‘कप्पू’चा भाऊ गप्पूदेखील पाहावयास मिळणार आहे. कपिल आपल्या शो ला अधिक मनोरंजनात्मक बनविण्यासाठी नवनवीन बदल घडवित असतो. कपिलने नुकताच ‘गप्पू’च्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला आहे. आणि लिहीले आहे की, ‘हाय...मै गप्पू हूॅँ....मैने कप्पू का अकाउंट हॅक किया है!’