Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माने गर्लफ्रेन्ड गिन्नीचे मानले आभार...पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 15:48 IST

कॉमेडीकिंग कपिल शर्मा सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत गुंतला आहे. पण त्याआधी कपिल काहीसा भावूक झालेला दिसला.

ठळक मुद्देहोय, गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ हिच्या वाढदिवसाला कपिल भावूक झाला. गिन्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कपिलने आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या.

कॉमेडीकिंग कपिल शर्मा सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत गुंतला आहे. पण त्याआधी कपिल काहीसा भावूक झालेला दिसला. होय, गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ हिच्या वाढदिवसाला कपिल भावूक झाला. गिन्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कपिलने आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. ‘आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत राहण्यासाठी आभार, मला साथ देण्यासाठी आभार, मला एक चांगली व्यक्ति बनवल्याबद्दल आभार.. मला प्रेम देण्यासाठी आभार...वाढदिवसाच्या शुभेच्छा, आय लव्ह यू’, असे कपिलने लिहिले आहे.

कपिलचा हा बदललेला अंदाज निश्चितपणे खास आहे. लवकरच कपिल गिन्नीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे.  ताजी बातमी मानाल तर येत्या १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. या पंजाबी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अद्याप कपिलने लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या लग्नासाठी १२ डिसेंबरचा मुहूर्त पक्का असल्याचे कळतेय. पंजाबी रितीरिवाजानुसार हे लग्न होणार आहे. येत्या १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होतील. सर्वप्रथम १० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी ‘माता का जागरण’ आहे. यानंतर दुसºयादिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.   गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

टॅग्स :कपिल शर्मा