Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छिछोरे'च्या टीमसमोर कपिल शर्माकडे कृष्णा अभिषेकनं मागितले एक कोटी रुपये, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 18:31 IST

द कपिल शर्मा शोमध्ये नुकतेच छिछोरे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी शोमध्येच अभिनेता कृष्णा अभिषेकनं कपिल शर्माकडे १ कोटी रुपये मागितले. 

द कपिल शर्मा शो नेहमीच चर्चेत असतो. शोमधील टीमचे वादविवाद आणि अतरंगी पात्र लोकांना खूप भावतात. या शोमध्ये येणाऱ्या टीमनुसार कलाकार पात्र ठरवतात आणि कलाकारांचे खूप मनोरंजन करतात. नुकतेच या शोमधील कृष्णा अभिषेक व कपिल शर्मा यांचे वादविवाद प्रेक्षकांना खूप भावली. हे दोघं एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये छिछोरे चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी कपिलने छिछोरे चित्रपटाच्या स्टारकास्टचा परिचय एका वेगळ्या अंदाजात करून दिला. या एपिसोडमध्ये कपिल शर्मा सपना (कृष्णा अभिषेक)ला म्हणाला की, तू नितीश तिवारीकडे रोल मागू नकोस कारण त्यांच्या चित्रपटात सपनासारख्या पात्राची गरज नाही. यावर कृष्णानं पटकन उत्तर दिलं की, बघा कोण बोलतंय. डिसेंबरमध्ये यांच्या घरी अभिनंदन करायला जाणार आणि आशीर्वादाच्या बदल्यात एक कोटी रुपये घेणार.

कृष्णा अभिषेकचं हे उत्तर ऐकून शोमधील सगळे हसू लागले. ही पहिली वेळ नाही जेव्हा कृष्णाने शोमध्ये कपिल शर्माची बोलती बंद केली असेल.

कपिल शर्मा व त्याची पत्नी गिन्नी चतरथ यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. याचंच उत्तर देत कृष्णा म्हणाला की, शुभेच्छा द्यायला येणार तेव्हा कपिलकडून एक कोटी रुपये घेणार.

टॅग्स :कपिल शर्मा द कपिल शर्मा शो