Join us
Daily Top 2Weekly Top 5

The Kapil Sharma Show: मध्ये झाला खुलासा 'याच' महिलेने म्हटले होते बाबा रामदेव यांना 'सेक्सी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:25 IST

योगगुरु म्हटले की सा-यांच्या चेह-यासमोर येतात ते बाबा रामदेव.आध्यात्मिक सल्ले,योगाभ्यास आणि आपल्या निरनिराळ्या लीला यामुळे योगगुरु बाबा रामदेव कायम ...

योगगुरु म्हटले की सा-यांच्या चेह-यासमोर येतात ते बाबा रामदेव.आध्यात्मिक सल्ले,योगाभ्यास आणि आपल्या निरनिराळ्या लीला यामुळे योगगुरु बाबा रामदेव कायम चर्चेत असतात.योगाभ्यास, आध्यात्माची माहिती असणारे बाबा कधी राजकारणावर बोलतात तर कधी कुस्तीच्या आखाड्यात ऑलिम्पियनला चीतपट करतात.अशा या बाबांच्या लीला अगाध.त्यामुळेच की काय त्यांचे फॅन्सही अनेक आहेत. यांत पुरुष,तरुणांसह तरुणी आणि महिलांचाही समावेश जास्त आहे. बाबा रामदेव यांच्या योग शिबीरात अनेक महिला त्यांच्याकडून योगाचे धडे घेतात.त्यामुळे योगगुरुंचे महिलांमध्येही विशेष आकर्षण आहे.नुकतेच कॉेमेडी नाईटस विथ कपिल शर्माच्या शोमध्ये बाबा रामदेव यांनी हजेरी लावली आणि असे अनेक किस्से बाबा रामदेव यांनी उघड केले.बाबा रामदेव यांचा फॅनफोलोविंग मध्ये महिला वर्गाची संख्या पुरूषांपेक्षा जास्त आहे.मात्र आता योगगुरुंनी एका महिलेबाबत केलेल्या या खुलाशामुळे ती बाला कोण असा सवाल निर्माण झाला आहे. एका योग शिबीरात या एका महिलेने बाबा रामदेव यांच्यापुढे चक्क लग्नाचा प्रस्ताव ठेवलाचेही खुद्द योगगुरु बाबा रामदेव यांनी हा खुलासा केला होता. तर एका महिलेने आपण मोकळ्या केसांमध्ये सेक्सी वाटल्याचेही बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले. या शिबीरात ही महिला एकटी नव्हती.ती आपल्या कुटुंबासह तिथे होती आणि सगळ्यासमक्ष तिने योगगुरुंवरील आपले प्रेम उघड केले.याआधी असाच काहीसा प्रकार आयटम गर्ल राखी सावंतनेही केला होता.बाबा रामदेव यांच्याशी लग्न करण्यासाठी तयार असल्याचे राखीने उघडपणे जाहीर केले होते. मात्र कायम पब्लिसिटी मिळवण्यासाठी फंडे शोधणा-या राखीचा हाही एक स्टंट असल्याचे ओळखून योगगुरुंनी तिला नकार दिला.माझ्याशिवाय अनेक अविवाहित पुरुष असल्याचा सल्ला राखीला बाबा रामदेव यांनी दिला होता.