Join us

कपिल शर्माने शेअर केला मुलीसोबत क्युट सेल्फि, देवाचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 20:01 IST

कॉमेडी किंग कपिल शर्मा एक स्टार होण्यासोबत एका गोंडस मुलीचा पितादेखील आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्मा एक स्टार होण्यासोबत एका गोंडस मुलीचा पितादेखील आहे. इतर सेलिब्रेटींप्रमाणे कपिल शर्मादेखील सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असतो. कपिल शर्मा अनेक वेळा मुलगी अनायरासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

नुकताच कपिलने मुलगी अनायरासोबत एक सेल्फि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फॅन्ससह अनेक बॉलिवूड स्टार्सना कपिलचा मुलीसोबतचा हा फोटो खूपच आवडला आहे. या फोटोत कपिलने अनायराने आपल्या कडेवर उचलून घेतले आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये कपिल लिहितो, 'आतापर्यंत सगळ्यात सुंदर गिफ्ट माझ्या हातात आहे. या सुंदर गिफ्टसाठी देवाचे अनेक आभार.'

गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो यांसारखे अनेक हिट कार्यक्रम कपिलने दिले आहेत. त्याने आपल्या कॉमिक टाइमिंगने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून 'किस किसको प्यार करूं' या सिनेमातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो 'फिरंगी' या सिनेमातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही. पण द कपिल शर्मा शो नेहमीच टिआरपी रेसमध्ये अव्वल असतो. 

टॅग्स :कपिल शर्मा