Join us

25 कोटींच्या बंगल्याचा मालक आहे कपिल शर्मा, त्याचं जगणंही आहे आलिशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 18:58 IST

कपिल शर्मा 12 डिसेंबर 2018 ला गिन्नीसोबत विवाह बंधनात अडकला होता. त्याने हिंदू धर्मानुसार लग्न केले होते. आता दोघांच्या आयुष्यात बाळाची देखील एंट्री झाली आहे.

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून करतो. याच शोने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सेलिब्रिटींचं घर कसं असेल, त्यांच्या घरात काय आहे, त्यांनी घर कसं सजवलं आहे हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच कॉमेडीयन कपिल शर्मा घर असंच आलिशान आहे. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

कपिलकडे मुंबईमध्ये एक खूप महागडा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे. अवैध बांधकामामुळे हा फ्लॅट अनेकदा वादात फसला होता. कपिलकडे लग्जरी मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1.19 कोटी रुपये आहे. - मर्सिडीजव्यतिरिक्त त्याच्याकडे Volvo XC सुद्धा आहे. त्याच्या कारची किंमत 90 ते 1.3 कोटींच्या जवळ जवळ आहे. - पंजाबमध्ये कपिल शर्माकडे एक प्रशस्त बंगला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा आहेत. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी कपिलने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

कपिल शर्मा 12 डिसेंबर 2018 ला गिन्नीसोबत विवाह बंधनात अडकला होता. त्याने हिंदू धर्मानुसार लग्न केले होते. आता दोघांच्या आयुष्यात बाळाची देखील एंट्री झाली आहे.कपिल त्याच्या लेकीसोबतचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असतो. 

टॅग्स :कपिल शर्मा