Kapil Sharma: अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्मा हे सातत्याने चर्चेत असणारं नाव आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माचे अनेक चाहते आहेत.छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर झळकून कपिलने इंडस्ट्रीत स्वत: च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, त्याचा हा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. त्याला अनेकदा चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. अलिकडेच कपिल शर्माने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याती कठीण प्रसंगाविषयी भाष्य केलं आहे.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने सांगितल, एक वेळ अशी आली जेव्हा लोक म्हणू लागले की त्याचं करिअर आता संपलं आहे. कपिल शर्माचे वडील जितेंद्र यांचं २००४ मध्ये कर्करोगामुळे निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर तो पू्र्णपणे खचला होता. कपिल नैराश्याचा शिकार झाला होता. या मुलाखतीत त्या कठीण काळाविषयी बोलताना तो म्हणाला, आयु्ष्यात प्रत्येक वेळ आपल्याला काही ना काही शिकवत असते. माझं बालपण फार वेगळं होतं कारण तेव्हा माझे बाबा हयात होते. मात्र, २००४ मध्ये त्यांचं निधन झालं आणि सगल्याच गोष्टी बदलल्या.
या मुलाखतीत पुढे कपिल म्हणाला, त्यानंतर मला टीव्हीवर काम करण्याची संधी मिळाली आणि मी सावरलो. ३६ व्या वर्षी नैराश्यात गेलो होतो. हा तर आता संपला आहे, असं लोक म्हणू लागले होते. परंतु, माझं लग्न झालं आणि मी शो पुन्हा सुरु केले. त्यानंतर मी जवळपास ३०० हून अधिक एपिसोड केले.
वडिलांच्या आठवणीत कपिल झाला भावुक...
दरम्यान, वडिलांबद्दल सांगताना कपिल म्हणाला, भूतकाळ कधीही बदलत नाही. जे सोडून गेले ते कधी परत येत नाहीत. जेव्हा मी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन ३' साठी ट्रॉफी जिंकली तेव्हा मला १० लाख रुपयांचा चेक मिळाला. त्यावेळी मला रडू कोसळलं. मी फक्त हाच विचार करत होतो की, आज माझे वडील इथे असते तर बरं झालं असतं. जेव्हा माझा शो सुरू झाला, तेव्हा मी रात्री ९ वाजता माझ्या घराबाहेर उभा होतो. सोसायटीतील सर्व घरांमध्ये टीव्ही चालू होते आणि माझा शो पाहणाऱ्या लोकांच्या हास्याचा आवाज मला ऐकू येत होता. मला वाटलं जर बाबा जिवंत असते तर ते खूप आनंदी झाले असते."
Web Summary : Kapil Sharma revealed he faced tough times and depression after his father's death in 2004. People thought his career was over, but he persevered, got married, restarted his show, and completed over 300 episodes. He emotionally recalled missing his father during his success.
Web Summary : कपिल शर्मा ने खुलासा किया कि 2004 में उनके पिता के निधन के बाद उन्होंने मुश्किल समय और अवसाद का सामना किया। लोगों को लगा कि उनका करियर खत्म हो गया है, लेकिन उन्होंने दृढ़ता दिखाई, शादी की, अपना शो फिर से शुरू किया और 300 से अधिक एपिसोड पूरे किए। उन्होंने अपनी सफलता के दौरान अपने पिता को याद करते हुए भावुक हो गए।