Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कपिल शर्माने त्याची प्रेयसी गिनीसोबत साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 10:25 IST

कपिल शर्मा सध्या त्याच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमापेक्षा सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या वादामुळे अधिक चर्चेत आहे. सुनीलने कपिलला ...

कपिल शर्मा सध्या त्याच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमापेक्षा सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या वादामुळे अधिक चर्चेत आहे. सुनीलने कपिलला माफ करावे आणि पुन्हा कार्यक्रमात यावे असे अनेकांचे म्हणणे आहे. पण सुनीलने कपिलच्या कार्यक्रमापासून दूर राहाण्याचेच ठरवले आहे. सिडनीवरून मुंबईला परतत असताना विमानात कपिलने केवळ सुनीलला शिव्याच घातल्या नाही तर त्याच्यावर हातदेखील उचलला असे उपस्थितांचे म्हणणे आहे. यानंतर सुनीलने कपिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.सुनील कार्यक्रमाचा भाग नसल्याने सध्या कपिलला चांगलेच टेन्शन आले आहे. सुनीलने कार्यक्रमात परत यावे यासाठी तो अनेक प्रयत्न करत आहे. पण कपिलने नुकतेच त्याचे हे टेन्शन बाजूला ठेवत एक संपूर्ण दिवस त्याच्या प्रेयसीसोबत घालवला आहे. सुनील आणि कपिलची विमानात भांडणे व्हायच्या काही दिवस आधीच कपिलने गिनी या त्याच्या प्रेयसीची लोकांना ओळख करून दिली होती. गिनी त्याच्या आयुष्यात असल्याचे त्याने एका ट्वीटच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले होते. कपिलचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा वाढदिवस गिनीसोबत साजरा केला. कपिल सध्या फिरंगी या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान येथे करत आहे. या चित्रपटात मोनिका गिल आणि राजेश शर्मा त्याच्यासोबत आहेत. राजस्थानमध्येच त्याने त्याच्या प्रेयसीसोबत त्याचा स्पेशल डे साजरा केला.कपिलने वाढदिवसानंतर त्याच्या फॅन्ससाठी एक ट्वीटदेखील केले आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही सगळ्यांनी मला दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचा आभारी आहे. सध्या मी राजस्थानच्या जंगलांमध्ये चित्रीकरण करत आहे. त्यामुळे तुमच्यासोबत गप्पा मारायला मला वेळ मिळात नाहीये. तुमच्या सगळ्यांवर मी नेहमीच प्रेम करतो. तुम्ही सगळे नेहमीच आनंदी राहा.