कपिल शर्माही झाला 'सैराट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 12:16 IST
तमाम रसिकांना याड लावल्यानंतर 'सैराट' पुन्हा एकदा झिंग झिंग झिंगाट करणार आहे. सुपरहिट कॅामेडी श 'द कपिल शर्मा 'या ...
कपिल शर्माही झाला 'सैराट'
तमाम रसिकांना याड लावल्यानंतर 'सैराट' पुन्हा एकदा झिंग झिंग झिंगाट करणार आहे. सुपरहिट कॅामेडी श 'द कपिल शर्मा 'या शोमध्ये सैराटची टीम हजेरी लावणार आहे.नुकतंच या भागाच शुटींग करण्यात आलं.विशेष म्हणजे 'सैराट'च्या यशाची कपिल शर्मानंही दखल घेतलीय.याविषयी कपिल शर्मानं व्टीट करून आपला आनंद व्यक्त केलाय. अशाप्रकारे पहिल्यांदाच कोणत्या मराठी सिनेमाचं यशाचं सेलिब्रेशन हिंदी शोमध्ये होणार शोमध्ये होणार आहे.बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत 'सैराट' सिनेमानं नवीन विक्रम रचलाय.अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत सैराटने ८० कोटींचा गल्ला जमवला. नागराज मंजूळेच्या या सिनेमातील परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भुरळ घातली असून सर्वाधिक कमाई करणारा 'सैराट' हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय.