Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिलची कमाई पाच करोड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:41 IST

कॉमेडी नाईटस विथ कपिल हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. पण कलर्स वाहिनीसोबत कपिल शर्माच्या झालेल्या वादानंतर त्याने हा कार्यक्रम ...

कॉमेडी नाईटस विथ कपिल हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. पण कलर्स वाहिनीसोबत कपिल शर्माच्या झालेल्या वादानंतर त्याने हा कार्यक्रम त्याच्या संपूर्ण टीमसोबत सोडला. त्याने त्यानंतर द कपिल शर्मा शो या कार्यक्रमापासून नवीन इनिंगला सुरुवात केली. या कार्यक्रमात त्याच्यासोबत नवज्योत सिंग सिद्धू, सुनील ग्रोव्हर, अली अजगर, किकू शारदा, सुमोना चक्रवती हे कॉमेडी नाईटस विथ कपिल कार्यक्रमातील कलाकारही झळकले. द कपिल शर्मा शोचा टीआपरपी खूपच चांगला आहे. या कार्यक्रमाच्या सगळ्याच कलाकारांना बक्कळ मानधन मिळत असल्याची चर्चा आहे. कपिल दर भागासाठी 60 लाख घेतो. म्हणजेच महिन्याला त्याला या कार्यक्रमातून पाच करोड मिळतात असे म्हटले जाते तर सुनील ग्रोव्हर 10-12 लाख, सिद्धू 8-10 लाख, सुमोना 6-7, किकू आणि अली 5-6 लाख प्रत्येक भागासाठी घेतात अशी चर्चा आहे.