कंगना रानौतने '2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर' च्या मंचावर स्पर्धकांसह धरला ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 11:03 IST
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला भेटण्याची संधी मिळणे,त्यांच्यासमोर परफॉर्म करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून आपली स्तुती होणे म्हणेज प्रत्येकासाठीच आनंदाची ...
कंगना रानौतने '2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर' च्या मंचावर स्पर्धकांसह धरला ताल
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला भेटण्याची संधी मिळणे,त्यांच्यासमोर परफॉर्म करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून आपली स्तुती होणे म्हणेज प्रत्येकासाठीच आनंदाची गोष्ट असते आणि हे सगळे सत्यात उतरलें .'2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर' च्या मंचावर.'रंगून' हा कंगनाचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचनिमित्ताने तिने या कार्यक्रमात हजेरी लावली होती.क्वीन, तनु वेड्स मनु अश्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी आणि बॉलीवूडची क्वीन म्हणजेच कंगना रनौतची 2 MAD च्या सेटवर धम्माकेदार एन्ट्री झाली. 2 MAD द्वारे कंगना पहिल्यांदाच मराठी टेलिव्हीजनवर एका डान्स शोमध्ये आली आहे. या खास एपिसोडमध्ये स्पर्धकांनी कंगनाच्या गाण्यावर डान्स करून तिला सरप्राईझ दिलं. महाराष्ट्रात असलेले भन्नाट टॅलेंट पाहून कंगनाही थक्क झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील मॅडनेस ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक नेहेमीच आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सुंदर नृत्याद्वारे सरप्राईझ देत असतात, पण यावेळेस मंच्यावर स्पर्धकांना मिळालं एक सरप्राईझ ! जिच्या अभिनयाची संपूर्ण दुनिया फॅन आहे अश्या अभिनेत्रीसमोर डान्स करायचा म्हणजे सगळ्याच स्पर्धकांना पहिले थोडं दडपण आलं. पण कंगनाने आपल्या दिलखुलास स्वभावाने त्यांच हे दडपण अगदी सहजरीत्या दूर केलं. कंगनाने कार्यक्रमामध्ये मराठी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धकांनी कंगना बरोबर बऱ्याच गंमती जमती देखील केल्या ज्या तुम्हाला या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हीजनवर प्रेक्षकांना पहिल्यांदाच कंगनाला बघायला मिळणार आहे एका वेगळ्याच अंदाजमध्ये. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर च्या सेटवर येऊन कंगना खूपच खुश होती त्यावर ती म्हणाली, “मी खूप खुश आहे या मंच्यावर येऊन. स्पर्धक खूप टॅलेंटेड आहेत, त्यांच्या डान्समध्ये मॅडनेस आहे.. हा डान्स शो आहे आणि डान्स म्हंटल कि,मॅडनेस हा आलाच. माझ्या मते प्रत्येक क्रियेटीव्ह कामामध्ये MADness असावाच लागतो”. या एपिसोडमध्ये सगळ्याच स्पर्धकांनी एक से बडकर एक नृत्य सादर केले. तुषार खेराडे आणि निधी डिचोळकर ह्यांनी कमीने सिनेमातील “पेहेली बार मोहाब्ब्त” वर अप्रतिम नृत्य सादर केले आणि कंगनाचे मन जिंकले. या डान्सनंतर कंगनाने तुषार चॅलेंज दिले जे तुषारने पूर्ण देखील केले आणि तुषारला कंगनाबरोबर डान्स करण्याची सुवर्णसंधी मिळाली. हे चॅलेंज काय होते हे तुम्हाला कार्यक्रम बघितल्यावरच कळेल. तसेच सोनल विचारे आणि सुरज मोरे यांनी “बन्नो तेरा” या कंगनाच्याच गाण्यावर लावणी सादर केली ज्याने परीक्षकांपासून स्पर्धकांचे तसेच कंगनाचे मन देखील जिंकले आणि ती म्हणाली “ठसकेबाज” झाली लावणी. विशेष म्हणजे कंगनाने स्टेजवर येऊन थोडी लावणीची झलक देखील प्रेक्षकांना दाखवली, जी तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 MAD मध्ये २१ फेब्रुवारीला. मंगेश पटणे आणि आर्या डोंगरे यांनी क्वीन या सिनेमातील “लंडन ठुमकता” या लोकप्रिय गाण्यावर कथकली नृत्यप्रकार सादर केला. या गाण्यावर कथकली या नृत्यप्रकारामध्ये देखील नृत्य सादर होऊ शकत हे बघून सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटले. या विशेष भागामध्ये सगळ्याच स्पर्धकांनी त्यांच्या नृत्य-कौशल्याने कंगनाला थक्क केले यात शंका नाही.