Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणी तरी येणार येणार गं...! 'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेत्रीनं दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 09:55 IST

'काहे दिया परदेस' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका काहे दिया परदेस(Kahe Diya Pardes)नं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहे.  या मालिकेतून सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि ऋषी सक्सेना (Rishi Saxena) ही जोडी घराघरात पोहोचली होती. या मालिकेत राधिका हे एका अल्लड मुलीचे पात्र पाहायला मिळाले. ही भूमिका मानसी सिंह मोहिले (Manasi Singh Mohile) हिने साकारली होती. मानसी मोहिले हिने नुकतीच गोड बातमी शेअर केली आहे. ती प्रेग्नेंट असून तिने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे मानसीवर सध्या सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तसेच तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला जात आहे. 

मानसी सिंग मोहिले प्रेग्नेंट असून तिने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, तू अधिक मी म्हणजे तीन. तिच्या या पोस्टवर मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

वर्कफ्रंटबद्दल..

मानसी सिंग मोहिले मराठी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मास मीडियाचे शिक्षण घेतल्यानंतर मानसी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू लागली. काहे दिया परदेस मालिकेमुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. नकुल मेहता सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत यूट्यूबवर बे कंट्रोल या नावाने ओळखल्या जाणार्‍या डाइस मीडियाची वेब सिरीजमध्ये तिने काम केले आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित तिने एका वेबसीरीजमध्ये काम केले आहे. मेरे साई, क्राईम पेट्रोल , स्वामिनी, श्रीमंताघरची सून अशा विविध मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बऱ्याचशा जाहिरातीतही काम केले आहे. परफेक्ट डेट, बॅड बॉईज ऑफ विल स्मिथ सारख्या चित्रपटांसाठी व्हॉइस डबिंग आर्टिस्ट म्हणून तिने काम केले आहे सोबतच दूरदर्शनचा टीव्ही शो बायोस्कोपचे अँकरिंग तिने केले आहे. दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करण्यासाठी तिने व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.