Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' लोकप्रिय मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:03 IST

छोट्या पडद्यावर 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे.

ठळक मुद्दे‘कहाँ हम, कहाँ तुम!’ ही मालिका येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आगळे कथाविषय आणि त्यातील व्यक्तिरेखांचे सुस्पष्ट रेखाटण यामुळे निर्माता संदीप सिकंद यांनी आजवर निर्मिती केलेल्या सर्व मालिकांबद्दल त्यांची प्रशंसा केली जाते. आता ते लवकरच ‘स्टार प्लस’वर ‘कहाँ हम, कहाँ तुम!’ ही मालिका सादर करणार असून त्यात दीपिका कक्कर आणि करण व्ही. ग्रोव्हर हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील. ‘कहाँ हम, कहाँ तुम!’ ही सोनाक्षी (दीपिका कक्कर) आणि रोहित (करण व्ही. ग्रोव्हर) या यशस्वी दाम्पत्याची कथा असून या दोघांना आपल्या व्यवसायातील कार्यबाहुल्यामुळे एकमेकांसाठी खाजगी वेळच मिळत नाही. सोनाक्षी ही टीव्हीवरील अभिनेत्री असून रोहित हा हृदयरोगतज्ज्ञ असतो.

हे कथानक आजच्या काळातील वस्तुस्थितीशी खूपच मिळतेजुळते असल्याने प्रेक्षकांना ते लगेच पटेल. या मालिकेचे कथानक कसे उलगडत जाते, ते पाहण्यची आम्हाला उत्सुकता लागली आहे.

 छोट्या पडद्यावर 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून 'कृष्णा चली लंडन’ या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तरी प्रेक्षकांना त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही; कारण येत्या 17 जूनपासून तिच्या जागी ‘कहाँ हम, कहाँ तुम!’ या मालिकेचे प्रसारण होणार आहे. 

टॅग्स :कृष्णा चली लंडन