Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती बनली परी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:54 IST

कवच... काली शक्तियों से या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. राजबीर म्हणजेच विवेक दहियाचे निधन झाल्याचे त्याच्या ...

कवच... काली शक्तियों से या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. राजबीर म्हणजेच विवेक दहियाचे निधन झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांना अनेक दिवसांपासून वाटत आहे. पण तो जिवंत असल्याचे आता सगळ्यांना कळणार आहे. त्याचसोबत मालिकेत ज्योती गुबाची एंट्री होणार आहे. ज्योतीने रिश्तो का सौदागर बाजीगर, कसम तेरे प्यार की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ज्योती आता कवच... काली शक्तियों से या मालिकेत एका परीची भूमिका साकारणार आहे. परिधीच्या प्रत्येक संकटात ती तिच्या पाठिशी उभी राहाणार आहे.