द कपिल शर्माच्या सेटवर जॅकी चैनने गिरवले अभिनयाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:51 IST
'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चैन नुकताच मुंबईत आला होता. मुंबईत आल्यावर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद ...
द कपिल शर्माच्या सेटवर जॅकी चैनने गिरवले अभिनयाचे धडे
'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चैन नुकताच मुंबईत आला होता. मुंबईत आल्यावर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याचसोबत त्याने द कपिल शर्मा या शोच्या सेटवरदेखील हजेरी लागली. एवढेच नव्हे तर त्याने सलमान खान, शिल्पा शेट्टी, कंगणा राणोट यांसारख्या बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली. हे सगळेच कलाकार जॅकी चैनला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. सलमान तर जॅकीला भेटण्यासाठी त्याच्या भाच्यालादेखील घेऊन आला होता. द कपिल शर्मा या शोमध्ये जॅकी चैनने खूप धमालमस्ती केली. यावेळी सोनू सूदही त्याच्यासोबत होता. एका हॉलिवूड स्टारने आपल्या कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे कपिल शर्मादेखील खूप खूश दिसत होता. बॉलिवूडच्या चित्रपटाचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभर आहेत. जॅकी चैनदेखील बॉलिवूड चित्रपटांचा चाहाता आहे. त्यामुळे कपिल शर्माच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानची सिगनिचर स्टेप जॅकी चैनला कपिल आणि सोनूने शिकवली. जॅकी चैननेदेखील त्याच्या अंदाजाज शाहरुखची मोहोब्बतेवाली स्टाइल करून दाखवली. तसेच अमिताभ बच्चन यांची कमरेवर एक हात ठेवून संवाद म्हणण्याची स्टाइलदेखील त्याने हूबेहूब केली. कुंग फू योगा हा एक अॅक्शन अॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपट आहे. जॅकी चैनचा हा चित्रपट 3 फेब्रुवारीला भारतात प्रदर्शित होणार आहे तर भारताच्या तीन दिवस आधी म्हणजेच 28 जानेवारीला हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. कुंग फू योगा हा चित्रपट स्टैनले टोंगने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात जॅकी चैनसोबत अभिनेता सोनू सूद, अमायरा दस्तूर आणि दिशा पटानीदेखील झळकणार आहेत.