अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा या रिअल लाइफमधील कपलचे होणार यारो का टशन या मालिकेत लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 13:26 IST
यारो का टशन या मालिकेत अनिरुद्ध दवे आणि सुरभी आहुजा आपल्याला नायक-नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...
अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा या रिअल लाइफमधील कपलचे होणार यारो का टशन या मालिकेत लग्न
यारो का टशन या मालिकेत अनिरुद्ध दवे आणि सुरभी आहुजा आपल्याला नायक-नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. ते दोघे खऱ्या आयुष्यातही नवरा-बायको असून आता मालिकेतदेखील त्यांचे लग्न होणार आहे.यारो का टशन या मालिकेत अनिरुद्ध दवे सुरुवातीपासून काम करत आहे तर सुरभीची या मालिकेत एंट्री काहीच महिन्यांपूर्वी झाली आहे. या मालिकेत नायिकेची एंट्री होणार असल्याचे सुरभीला कळले. या भूमिकेसाठी अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले जात होते. सुरभीने अनिरुद्धला काहीही न सांगता ऑडिशन दिले आणि ती सिलेक्ट झाली. सुरभी नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सिलेक्ट झाली असल्याचे या मालिकेच्या टीमनेदेखील अनिरुद्धपासून लपवून ठेवले. सुरभीला चित्रीकरणाच्या ठिकाणी पाहिल्यावर अनिरुद्धला चांगलेच सरप्राइज मिळाले होते. अनिरुद्ध आणि सुरभी यांची ओळख बंधन या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्यावेळी हे दोघे केवळ फ्रेंड्स होते. विशेष म्हणजे या मालिकेत सुरभीने अनिरुद्धशी लग्न करायला नकार दिला असे आपल्याला पाहायला मिळाले होते. ही मालिका सुरू असताना या दोघांनीही लग्नाचा काहीही विचार केला नव्हता. पण या दोघांचे आई-वडील एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतात. त्यांनी या दोघांचे लग्न ठरवले आणि 26 नोव्हेंबर 2015ला या दोघांनी अरेंज मॅरेज केले. यारो का टशन या मालिकेत आता अनिरुद्ध आणि सुरभी यांचे लग्न होणार असल्याने त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचे ते सांगतात. मालिकेत लवकरच त्यांचा साखरपुडा, हळद, संगीत आणि लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.