Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुई गडकरीने बिग बॉस मराठीतील कॅमेऱ्यांना ठेवली ही नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 13:00 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहाणारे रहिवाशी आता गेल्या ५० दिवसांपासून राहात आहेत. कुठल्याही प्रकारची बाहेरच्या विश्वातील माहिती ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहाणारे रहिवाशी आता गेल्या ५० दिवसांपासून राहात आहेत. कुठल्याही प्रकारची बाहेरच्या विश्वातील माहिती त्यांच्या पर्यंत पोहचत नाही, इतक्या दिवसांपासून त्यांचा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क नाही. त्यामुळे २४ तास ते घरातील सदस्यांशी बोलतात, भांडतात, भावना व्यक्त करतात. घरामध्ये करमणुकीचे कुठलेही साधन नाही, त्यामुळे घरातील सदस्य रोज काही ना काही करमणुकीचे साधन शोधत असतात. अशातच एक साधन म्हणजे या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेले कॅमेरा जे सदस्यांवर २४ तास नजर ठेवून असतात. जणू हे सदस्य त्यांच्या नजरकैदेतच आहेत. जुई गडकरी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. तिने यावेळेस बऱ्याच भावना व्यक्त केल्या, काही गोष्टी देखील सांगितल्या.जुईने सांगितले कि, या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मी १५ वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांबरोबर राहिले... आता मी माणसांमध्ये राहू शकते, पहिले मला माणसांपेक्षा प्राणी आवडायचे, मी प्राणी प्रेमी आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहून आल्यावर मी पहिल्यापेक्षा जास्त शांत झाले आहे. मला जगणं अधिक आवडू लागले आहे असे मी म्हणेन. बिग बॉस मराठीच्या घराबद्दल सांगायचे तर आम्ही घरातील कॅमेरांना वेगवेगळी नावे ठेवली होती. कारण आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायचो, तेव्हा ते आमच्याकडे बघायचे... PAN, Focus, झूम करायचे त्यामुळे छान वाटायचे. दाभोळकर, साळुंखे, डिसुजा, कधी काका – काकू असे देखील आम्ही त्यांना प्रेमाने म्हणायचो असे तिने सांगितले.गेल्या आठवड्यामध्ये जुई गडकरी, सई लोकूर आणि आस्ताद काळे हे डेंजर झोनमध्ये आले आणि जुईला घराबाहेर जावं लागलं. जुई घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, भूषण खूप भावुक झाले. नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी जुईला देखील मिळाली. जुईने या वेळेस तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.   Also Read : ​बिग बॉस मराठीची स्पर्धक मेघा धाडेच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?