Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:12 IST

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या दिवसापासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेची कथा, अर्जुन-सायलीची केमिस्ट्री, यातले टिस्ट अँड टर्न्स सगळंच प्रेक्षकांना आवडलं. मालिकेत सध्या कोर्ट ड्रामा सुरु आहे. विलास मर्डर केस अर्जुन लढत आहे. २ वर्षांपासून ही केस सुरु असून आता अखेर या केसचा निकाल या महिन्यात लागणार आहे. फक्त ३० दिवस बाकी...म्हणत मालिकेचा प्रोमो नुकताच आला. यावरुन मालिका ३० दिवसांनी संपणार का असा संभ्रम चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. यावर सायलीने म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) स्पष्टीकरण दिलं आहे.

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ...ठरलं तर मग! विलास खून खटल्याचे शेवटचे ३० दिवस. मालिका संपत नाहिये, पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय! नक्की बघा ठरलं तर मग."

मालिकेत अजून तन्वीच सायली आहे हे मोठं सत्य कळायचं आहे. ते कळायला आणखी २ वर्ष तर लागणार नाही ना अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तसंच इतरांनीही कमेंट करत मालिका खूप इंटरेस्टिंग सुरु असल्याचं लिहिलं आहे.

५ डिसेंबर २०२२ रोजी 'ठरलं तर मग' मालिका सुरु झाली. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर मालिकेचा कथा आधारित आहे. नंतर त्यात बरेच ट्विस्ट अंड टर्न्स आले आहेत. अडीच वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेताटेलिव्हिजन