Join us

जुही परमारच्या मुलीने असे केले काही की, ती झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 06:30 IST

किचन चॅम्पियनच्या दिल का रिश्ता या आगामी भागात आई-मुलीच्या नात्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. जुही परमार तिच्या आई आणि मुलीसह या कार्यक्रमात झळकणार आहे

ठळक मुद्देसमायरा जुहीला आश्चर्याचा धक्का देत तिने स्वतः लिहिलेली कविता म्हणणार आहे. ही कविता ऐकल्यावर मुलीच्या या प्रेमाच्या आविष्काराने जुही भावुक होणार असून माझ्या मुलीचा मला अभिमान असल्याचे सगळ्यांना सांगणार आहे.

जुही परमार हे छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं नाव. छोट्या पडद्यावर गाजलेल्या कुमकुम मालिकेतून तिने सात वर्षं रसिकांचे मनोरंजन केले. अभिनेता सचिन श्रॉफ सोबत लग्न झाल्यानंतर जुही अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. दरम्यानच्या काळात बिग बॉस, पती पत्नी और वो यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली. जुहीने कित्येक वर्षांनंतर 'कर्मफल दाता शनी' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. 

जुही तिच्या कमबॅकमुळे चर्चेत असतानाच तिच्या आणि सचिनच्या घटस्फोटाची बातम्या मीडियात येऊ लागल्या. जुही आणि सचिन यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर वेगळे व्हायचे ठरवले. त्यांना समायरा ही मुलगी असून ती सध्या जुहीसोबत राहाते. त्या दोघांनी नुकतेच कलर्सवरील किचन चॅम्पियन या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले.

किचन चॅम्पियनच्या दिल का रिश्ता या आगामी भागात आई-मुलीच्या नात्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. जुही परमार तिच्या आई आणि मुलीसह या कार्यक्रमात झळकणार आहे तर अभिनेत्री मानसी पारेख तिची आई आणि मुलगी निरवीसोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. किचन चॅम्पियन बनवण्यासाठी जुही आणि मानसी यांच्या कुटुंबियात स्पर्धा रंगणार आहे.

किचन चॅम्पियन या कार्यक्रमाचा हा आगामी भाग म्हणजे भरपूर मनोरंजन आणि भावनांनी भरलेला असणार आहे आणि त्यात तीन पिढ्यांच्या नात्याचे विलक्षण समीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कुकिंग करण्याचा आनंद लुटत असताना, जुही तिच्या मुलीच्या समायराच्या काही त्रासदायक सवयी आणि काही गंमती सगळ्यांना सांगणार आहे आणि त्याच बरोबर ती कविता छान म्हणते हे सुद्धा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. हे ऐकताच या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अर्जुन बिजलानी समायराला मंचावर बोलावणार असून तिला कविता म्हणायला सांगणार आहे. यावर समायरा जुहीला आश्चर्याचा धक्का देत तिने स्वतः लिहिलेली कविता म्हणणार आहे. ही कविता ऐकल्यावर मुलीच्या या प्रेमाच्या आविष्काराने जुही भावुक होणार असून माझ्या मुलीचा मला अभिमान असल्याचे सगळ्यांना सांगणार आहे.

टॅग्स :कलर्स