चाहूलमधील सर्जा आणि शांभवीने घेतला पाऊसाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:53 IST
पाऊस म्हटला की, रोमँटिक वातावरण. पावसात एकमेकांसोबत वेळ घालवण्याची मजा काही औरच असते. चाहूल या मालिकेत शांभवी सर्जावर प्रेम ...
चाहूलमधील सर्जा आणि शांभवीने घेतला पाऊसाचा आनंद
पाऊस म्हटला की, रोमँटिक वातावरण. पावसात एकमेकांसोबत वेळ घालवण्याची मजा काही औरच असते. चाहूल या मालिकेत शांभवी सर्जावर प्रेम करते हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण शांभवी त्याला हे सांगू शकत नाही. शांभवी आपले हे प्रेम कधी व्यक्त करेल याची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेत अक्षर कोठारी सर्जाची तर रेश्मा शिंदे शांभवीची भूमिका साकारत आहेत. ते दोघे खऱ्या आय़ुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांच्यात खऱ्या आयुष्यात खूप चांगली केमिस्ट्री असल्याने प्रेक्षकांना ती मालिकेत पाहायला मिळते. चाहूल या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नुकताच खूप पाऊस पडत होता. अक्षर आणि रेश्माने या पावसात भिजून पावसाचा मनमुराद आनंद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी पावसाळ्यात बुट्ट्यावर देखील मनसोक्त ताव मारला.चाहूल या मालिकेतील सर्जा म्हणजेच अक्षर कोठारी सांगतो, मी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळा सुरू झाला की गाडी घेऊन बाहेर पडणे ही परंपरा आहे. मग कुठे कसे आणि कधी असे प्रश्न कधीच पडत नाहीत. पावसाळा हा मुळातच खूप रोमँटिक ऋतू आहे. लाँग ड्राईव्ह, सिनेमा पाहाणे, मस्त भजी खाणे या सगळ्या गोष्टी मी खूपच एन्जॉय करतो. मी माझ्या बायको बरोबर म्हणजेच मानसी बरोबर लाँग ड्राईव्हवर जातो, सिनेमा बघतो, पावसाळ्यात धम्माल मस्ती करतो.तर शांभवी म्हणजेच रेश्मा शिंदे ला देखील हा ऋतू खूप आवडतो. ती देखील हा ऋतू खूप एन्जॉय करत असल्याचे सांगते. Also Read : चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?