जॉनी लिव्हर करणार रंग माझा वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 13:19 IST
बॉलीवुड इंडस्ट्रीचा विनोदी एक्का जॉनी लिव्हर आता करणार रंग माझा वेगळा या मराठी चित्रपटाने पुर्नगमन. जॉनीने यापूर्वी देखील एक ...
जॉनी लिव्हर करणार रंग माझा वेगळा
बॉलीवुड इंडस्ट्रीचा विनोदी एक्का जॉनी लिव्हर आता करणार रंग माझा वेगळा या मराठी चित्रपटाने पुर्नगमन. जॉनीने यापूर्वी देखील एक दोन मराठी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. यशवंत बाजीवराव यांनी केले आहे. या चित्रपटात मोहन जोशी यांनी आपल्या दमदार अभिनयाने कमालीचा रंग भरला आहे. तर चेतन दळवी, प्रभाकर आंबुणे, जॉनी लिव्हर यांच्या धम्माल कॉमेडीच्या रंगाची उधळण केली असून अनंत जोग यांनी उत्तम खलनायक साकारला आहे. तसेच विक्रम पटेल व हेमांगिनी काज ही नवोदित जोडी या चित्रपटाद्वारे पदापर्ण करीत आहे. या चित्रपटाची गाणी उषा मंगेशकर, स्वप्नील बांदोडकर, धनश्री गाणात्रा, प्रमिला जोग, पुनम गोडबोले यांनी स्वरबध्द केली आहेत. आगळावेगळा हा चित्रपट धम्माला कॉमेडी, फॅमिली ड्रामा आणि उत्कृष्ट गीत-संगीत असलेला बहारदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.