Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जिजाजी छत पर है या मालिकेत पंचम आणि पिंटू जाणार हनीमूनला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 12:36 IST

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' ही विनोदी मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच तिच्या मनोरंजनपूर्ण कन्टेन्टसाठी ...

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' ही विनोदी मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मालिका सुरू झाल्यापासूनच तिच्या मनोरंजनपूर्ण कन्टेन्टसाठी मालिकेची प्रशंसा केली जात आहे. या मालिकेच्या वेळेत आता बदल होणार असून १४ मे २०१८ पासून मालिकेचे चाहते त्यांच्या या आवडत्या मालिकेचा आनंद सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता घेऊ शकणार आहेत. वेळेमधील बदलासह मालिका आता नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे. एक ज्योतिषी मुरारीला सांगणार आहे की, नवविवाहित जोडप्याशी चांगुलपणाने वागल्यास त्याला लाभ होणार आहे. या कामासाठी छोटे मुरारीला पंचम आणि पिंटूचे नाव सुचवणार असून मुरारीलाही हा विचार पटणार आहे. मुरारीला पिंटूकडून कळणार आहे की, ते दोघे आतापर्यंत कधीच हनीमूनला गेलेले नाहीत. म्हणून तो पंचम आणि पिंटूला हनीमूनसाठी मनालीला पाठवण्याचे ठरवणार आहे. हे ऐकून आनंदित झालेली ईलायचीसुद्धा त्यांच्यासोबत मनालीला जाण्याची योजना आखणार आहे. आपल्या शाळेची सहल जात असल्याचे ती सांगणार असून त्यासाठी मुरारीकडून परवानगी घ्यायला जाणार आहे. पण तिला मुरारी परवानगी देणार नाहीये. त्यामुळे मनालीला जाण्याचे बेत रद्द करा, नाहीतर पिंटू हा पुरुष असल्याचे गुपित उघडकीस आणेन, अशी धमकी ईलायची देणार आहे. त्यामुळे पंचम मुरारीकडे जाऊन त्याला मनालीला जाण्याचे बेत रद्द करण्याची विनंती करणार आहे. मुरारी याबबात ज्योतिषीसोबत चर्चा करणार असून ज्योतिषी त्याला सांगणार आहे की, हे शुभ कार्य घडले नाही तर त्याचे काहीतरी वाईट होईल. शेवटी, मुरारी पंचम आणि पिंटूवर हनीमूनला जाण्यासाठी दबाव टाकणार आहे. त्यामुळे पंचम मदतीसाठी ईलायचीला विनंती करणार असून या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ईलायची मस्त बेत आखणार आहे. पंचम आणि पिंटू खरंच हनीमूनला जाणार का? ईलायचीची योजना पंचमला वाचवेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये मिळणार आहे. या मालिकेतील नव्या ट्विस्टविषयी पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा सांगतो, ''हा अत्यंत विनोदी एपिसोड आहे. पिंटू आणि मी हनीमूनसाठी मनालीला जाणार आहोत. ईलायची यामध्ये कोणते ट्विस्ट आणते हे पाहण्यासाठी चाहत्यांना मालिका पाहावी लागणार आहे.''Also Read : जिजाजी छतपर हैं मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार