Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जिजाजी छत पर है' मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 13:14 IST

सोनी सबवरील जिजाजी छत पर है ही मालिका प्रेक्षकांना नेहमीच आनंद देते. या मालिकेत प्रत्येक वेळी प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळते.

ठळक मुद्देइलायची या भामट्या माणसाला धडा शिकवू शकेल का?

सोनी सबवरील जिजाजी छत पर है ही मालिका प्रेक्षकांना नेहमीच आनंद देते. या मालिकेत प्रत्येक वेळी प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळते. प्रत्येक पात्र काहीतरी गोंधळ घालते आणि या कार्यक्रमातील विनोद आणखीन वाढवत असतो.

मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये, मुरारी (अनुप उपाध्याय) त्याच्या 20 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीवर फार्महाउस बांधायच्या योजना आखतोय. पण त्यातही एक अडचण येणार आहे. एक भामटा (अश्विन कौशल) त्या जमिनीवर हक्क सांगतो आहे आणि मुरारीला त्याचीच जमीन परत देण्यासाठी ५० लाख रुपये द्यायला सांगतो आहे. मुरारीने दरोगा पिंकी (नवीन भावा) या एजंटकडून जमिनीचा व्यवहार केला होता, त्यावेळी मुरारीला फसवणूक करणाऱ्या आणि राजकीय कनेक्शन असलेल्या गुंडाची माहितीही देण्यात आली होती. इलायची या भामट्या माणसाला धडा शिकवू शकेल का? की मुरारीला जमीन परत मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतील?

या ट्रॅकविषयी, इलायचीची भूमिका करणाऱ्या हिबा नवाब म्हणाल्या की, ''हा ट्रॅक फारच उत्साहवर्धक आहे. यात एक दुष्ट, त्रास देणारा जमीन मालक आहे आणि आपल्या वडिलांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी प्रत्येकप्रकारे मदत करणारी मुलगी ही आहे. या ट्रॅकवरच हे भाग आधारित आहेत. या भागांमधल्या भावना संमिश्र आहेत.’’

टॅग्स :जिजाजी छत पर है