Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिजाजी छत पर है या मालिकेच्या टीमने १०० भाग पूर्ण झाल्याचे असे केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 10:44 IST

सोनी सबची जिजाजी छत पर है या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आपल्या अत्यंत धमाल कन्टेंटद्वारे ती ...

सोनी सबची जिजाजी छत पर है या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आपल्या अत्यंत धमाल कन्टेंटद्वारे ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आपल्या अत्यंत खास आणि तरीही आनंददायी व्यक्तिरेखांद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या शोचे १०० यशस्वी एपिसोड्स नुकतेच पूर्ण झाले आहेत. हा खास टप्पा साजरा करण्यासाठी यातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी सेटवर खास चाट पार्टीचे आयोजन केले होते.केक कापल्यानंतर एका चाट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कलाकार आणि संपूर्ण क्रूने खूप धमाल केली. त्यांनी या पार्टीचा पुरेपूर आनंद लुटला. सर्व कलाकार मजेच्या मूडमध्ये होते आणि हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्यासाठी ते एकत्र आले होते. निखिल खुराना, हिबा नवाब, सोमा राठोड, अनुप उपाध्याय, हरवीरसिंग आणि राशी बावा हे कलाकार या वेळी उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी विविध चाट प्रकार आणि बर्फाच्या गोळ्यांचा आनंद लुटला आणि ते बनवण्याचाही प्रयत्न केला.इलायचीच्या भूमिकेत दिसणारी हिबा नवाब याविषयी सांगते, “सर्व कलाकार आणि कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला आमच्या प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळाले त्यामुळे आम्ही आनंदात आहोत. या शोच्या चाहत्यांनी माझ्या व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम केले आहे आणि आज त्यांच्यामुळेच या शो ला हे यश मिळाले आहे. हा शो आणखी १००० एपिसोड पूर्ण करेल आणि आम्ही यशाच्या पायऱ्या चढत राहू अशी आम्हाला आशा वाटते. या शोच्या यशाबद्दल बोलताना पंचमच्या भूमिकेतील निखिल खुराना सांगतो,“ प्रेक्षकांकडून आम्हाला मिळणारे प्रेम आणि ते ज्या पद्धतीने आमच्या शोचा आनंद घेत आहेत ते पाहणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सेटवरील प्रत्येकासाठी १०० एपिसोड पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा क्षण आहे. या शोसाठी चित्रीकरण करणे हा एक अत्यंत चांगला आणि आनंददायी अनुभव आहे आणि आमच्या चाहत्यांकडून प्रेम आणि सहकार्य मिळत राहील अशी आम्हाला आशा वाटते.”Also Read : ​जिजाजी छत पर है मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार