Join us

​जान्हवीचे बाबा चाणक्याच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 17:36 IST

होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते मनोज कोल्हटकर प्रेक्षकांना आता एका वेगळ्याच भूमिकेत ...

होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते मनोज कोल्हटकर प्रेक्षकांना आता एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनावरील चंद्र-नंदिनी या मालिकेत ते चाणक्य ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी याआधी चक्रवती अशोक सम्राट या मालिकेत चाणक्याच्या कट्टर विरोधकाची म्हणजेच महामात्य खल्लटकची भूमिका साकारली होती. या दोन्ही भूमिका संपूर्णपणे एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. या भूमिकेविषयी मनोज सांगतात, "या भूमिकेसाठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांनी ऑडिशन दिले होते. पण एकता कपूरला माझे ऑडिशन आवडले आणि या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. नोव्हेंबर 2015मध्ये मी ऑडिशन दिले आणि त्यानंतर मार्च 2016मध्ये मी पायलट एपिसोडचे चित्रीकरण केले. या दरम्यानच्या काळात या भूमिकेसाठी मी खूप वाचन केले. तसेच चाणक्यांविषयी विविध माहिती शोधली. या मालिकेची कथा खूप चांगली असल्याने आणि स्टारकास्ट तगडी असल्याने ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे."