Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता'मधील जेठालालची काश्मीरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, सलमान खानसोबतही घेतलाय पंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:58 IST

'तारक मेहता'मधील गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली होती. सिंपल खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत नेहमीच काहीना काही वेगळे पहायला मिळते. एकदा मालिकेत दयाभाभी शिवाय जेठालालची आणखी एक पत्नीने एन्ट्री मारली होती तेव्हा खूप धमाका झाला होता. मात्र दयाभाभीवरील प्रेक्षकांच्या प्रेमापुढे दुसऱ्या पत्नीचा निभाव लागला नाही. मालिकेत जेठालाल काश्मीरी पत्नी म्हणजेच गुलाबोने चारचाँद लावले होते. गुलाबोची भूमिका भलेही छोटी होती मात्र प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली होती. सिंपल खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.

तुम्हाला आठवत असेल की तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेव्हा जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी बॅचरल पार्टीत सहभागी होण्यासाठी जेव्हा मित्रांसोबत काश्मीरला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभाग घेतला होता. याच चित्रपटात जेठालालची पत्नी गुलाबो म्हणजेच सिंपल कौल बनली होती. या भूमिकेत गुलाबो इतकी सीरियस झाली होती की ती जेठालालला शोधत मुंबई पर्यंत आली होती. ही गोष्टच इथेच संपली नव्हती तिला जेठालाल हवाच होता. त्यासाठी गुलाबोने कोर्टाची पायरी चढली होती. तिने गोकुळधाम सोसायटीत तंबूदेखील लावला होता, मात्र दया भाभीच्या प्रेमापुढे गुलाबोचे प्रेम फिके पडले आणि गुलाबोला अखेर परत जावे लागले होते.

सिंपल कौल खऱ्या आयुष्यात खूप हॉट आणि बोल्ड आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सिंपल कौलने २००२ साली करिअरची सुरूवात केली.

तिने 'कुसुम', 'कुटुंब', 'शरारत', 'ये मेरी लाइफ है', 'बा बहू और बेबी', 'ऐसा देश है मेरा', 'तीन बहूरानियां', 'सास बिना ससुराल', 'जिनी और जुजू', 'सुव्रीन गुग्गल-टॉपर ऑफ द इयर' आणि 'भाखड़वाली' या मालिकेत काम केले आहे.

अभिनयाशिवाय सिंपल कौल एक बिझनेस वुमन आहे. तिचे तीन रेस्टॉरंट आहे, जे तिने मुंबईत सुरू केले आहे. सिंपलने २०१० साली राहुल लूंबासोबत लग्न केले होते. पुन्हा एकदा सलमान खानसोबत पंगादेखील घेतला होता.

खरेतर बिग बॉस सीझन १२मध्ये सलमान खानने म्हटलेली एक साधी गोष्ट पटली नव्हती आणि तिचा मित्र करणवीर बोहराच्या समर्थनात तिने सलमान खानवर ट्विटरवर निशाणा साधला होता.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा