Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बबिताजी कुठे आहेत?' पापाराझींच्या प्रश्नावर जेठालालने दिलं उत्तर, पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:39 IST

जेठालालने सपत्नीक आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सगळीच पात्र खूप गाजली. त्यातही जेठालालचं बबिताजींसाठी असलेलं छुपं प्रेम नेहमीच हसवतं. नुकतंच जेठालाल उर्फ अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आमिर खानची लेक आयराच्या रिसेप्शन पार्टीला सपत्नीक हजेरी लावली. यावेळी त्यांनी पापाराझींना पोज दिली. पापाराझींनी 'बबिताजी कुठे आहेत?' असा प्रश्न विचारला. यावर दिलीप जोशींनी दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू आलं.

आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं १३ जानेवारी रोजी मुंबईत रिसेप्शन होतं. यासाठी रेखा, हेमा मालिनीपासून ते रणबीर कपूर, मृणाल ठाकूरपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. तसंच आमिर खानने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतीलही अनेक कलाकारांना आमंत्रण दिलं होतं. दरम्यान अभिनेते दिलीप जोशी त्यांच्या पत्नीसह आले होते. ब्लॅक कोटमध्ये ते यंग दिसत होते. तर त्यांची पत्नी निळ्या ड्रेसमध्ये आली होती. दोघांनी अगदी दिलखुलास हसत माध्यमांसमोर पोज दिली. तसंच पापाराझींशी गप्पाही मारल्या. तेव्हा पापाराझींनी विचारले, 'बबिताजी कुठे आहेत?' यावर दिलीप जोशी उत्तर देत म्हणाले, 'त्यांच्या घरी, अजून कुठे?'

जेठालाल हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिलीप जोशी आपल्या रिअल लाईफ पत्नीसोबत खूप कमी वेळा दिसले आहेत.  त्यांच्या पत्नीनेही हसत यावर क्युट रिअॅक्शन दिलेली पाहायला मिळते. चाहत्यांना त्यांच्या पत्नीचा अंदाज भलताच आवडला आहे. तसंच अनेकांनी दयाबेनची आठवण काढली आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारसोशल मीडिया