Join us

OMG! छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'ची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:44 IST

ही मालिका करणार अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोला रिप्लेस करणार आहे.

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट 'बेहद 2' ला घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बेहद 2'चा लाईव्ह प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जेनिफर मायाच्या 'लूक'मध्ये दिसतेय. यावेळी मायाची भूमिका खूप वेगळी आहे हे प्रोमो बघून स्पष्ट होतेय. आधीच्या 'बेहद' मध्ये जेनिफरने साकारलेली मायाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. मायामध्ये असलेला वेडेपणा तिने तिच्या भूमिकेतून खूपच चांगल्याप्रकारे सादर केला होता.  जेनिफरचे फॅन्स माया परतते आहे म्हणून खूश आहेत, पण जेनिफरने हेदेखील स्पष्ट केले आहे ती तिची मालिका अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोला रिप्लेस करणार आहे.

 बेहद या मालिकेमुळे तिच्या करियरला एक चांगले वळण मिळाले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार लाईव्ह प्रोमोमध्ये जेनिफरने फॅन्सना ऑप्शन दिले की हा शो त्यांना टीव्हीवर किती वाजता बघायला आवडेल. 9 ते 9.30 की, रात्री 10 वाजता. त्यामुळे आता या शोला कोणता टाईम स्लॉट मिळतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

बेहद या मालिका जेनिफरच्या करियरमधली टर्निंग पॉईंट ठरली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.  जेनिफर डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. कोड एम असे या वेबसीरिजचे नाव आहे. ही ऑल्ट बालाजीची वेबसीरिज आहे.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन