‘जग्या’ आता बनला लष्करी जवान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:08 IST
'जाना ना दिल से दूर' या मालिकेत रसिकांना शशांकचं दर्शन घडणार आहे. डॉक्टरची भूमिका साकारल्यानंतर शशांक आता लष्करी जवानाच्या ...
‘जग्या’ आता बनला लष्करी जवान !
'जाना ना दिल से दूर' या मालिकेत रसिकांना शशांकचं दर्शन घडणार आहे. डॉक्टरची भूमिका साकारल्यानंतर शशांक आता लष्करी जवानाच्या भूमिकेत या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत रविश वशिष्ट ही व्यक्तीरेखा शशांक साकारणार आहे. या मालिकेत एक प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. अर्थव (विक्रमसिंह चौहान) आणि विविधा (शिवानी सुर्वे) यांच्या जीवनात रविशच्या (शशांक) एंट्रीमुळे काय घडणार याचं चित्रण रसिकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यास मिळत असल्याने 13 महिन्यांची प्रतीक्षा फळाला आली अशी प्रतिक्रिया शशांकनं दिलीय. 13 महिन्यांनंतरच्या विश्रांतीनंतर पहिला सीन शशांकनं महाबळेश्वरमध्ये चित्रीत केला. लष्करी प्रशिक्षणाच्या या सीनमध्ये त्याला चांगलाच घाम गाळावा लागला. आता शशांक साकारत असलेला लष्करी जवान रसिकांना कितपत भावतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.