Join us

जयंतने सांगितला 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवीच्या बर्थडे सीनचा मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:51 IST

'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. आता कारण आहे ते म्हणजे जयंत आणि जान्हवीचे फुलणारं नातं. या जोडीला प्रेक्षकांचं पुरेपूर प्रेम मिळत आहे.

'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. आता कारण आहे ते म्हणजे जयंत आणि जान्हवीचे फुलणारं नातं. या जोडीला प्रेक्षकांचं पुरेपूर प्रेम मिळत आहे. मालिकेत जान्हवी-जयंतचा हल्लीच साखरपुडा झाला आणि लगेच जान्हवीचा वाढदिवस आला आहे. जान्हवीची अपेक्षा आहे आपल्या घरी वाढदिवस एकदम छान साजरा केला पाहिजे. हे जयंतला कळलंय आणि तो तिचा वाढदिवस खास बनवण्यासाठी पूर्ण तयारी करतोय. जयंत जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. वाढदिवसाला जयंत तिला अनेक सरप्राईज देणार आहे.  

जान्हवी आपल्या लग्नाच्या कार्डची डिझाईन फायनल करते. त्यानंतर सर्व शॉपिंगसाठी जाणार आहेत. श्रीनिवासच्या म्हणजेच बाबांच्या खरेदीमध्ये तडजोड करते, जयंत हे पाहतो. घरी परतल्यावर, जयंत जान्हवीला हवे असलेले सर्व दागिने पाठवतो, ज्यामुळे सगळे आश्चर्यचकित आहेत. जान्हवीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जयंत सर्व काही करणार आहे. तिच्यासाठी वाढदिवसाला क्रूज आणि जेटप्लेन मध्ये तिला फिरायला नेतो.

याबद्दल मेघन जाधव म्हणाला, "जान्हवीच्या बर्थडे सीनचा किस्सा खूप गंमतशीर आहे. पहिले तर एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा उत्तम अनुभव होता. मी २० वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि जेव्हा मला कळले की आमच्या मालिकेत क्रूज आणि जेटप्लेनमध्ये शूट करणार आहोत ते ही एका दिवसात तेव्हा मी प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो हे सर्व कसे साध्य केले जाईल. कारण बिलकुल सोपे नव्हते. इतक्या कमी वेळेत सर्व पार पडणे, पण आम्ही ते केले. मला अचानक रात्री कॉल आला की उद्या गोव्याला जायचे आहे, आउटडोअरमध्ये काही दिवस आधी ठरत आणि कळवले जात पण आमचे अचानक ठरलं. मी लहानपाणी गोव्याला गेलो होतो आणि त्यानंतर आता जात होतो तर त्याची उत्सुकता ही होती. याहून जास्त जबरदस्त मनात भावना ही होती की आपण फक्त एका दिवसासाठी, एक सीन शूट करायला जात आहोत."

तुमची साथ अशीच लाभू दे-मेघन

त्याने पुढे लिहिले की, मी शूटिंगचे बरेच अनुभव घेतले आहेत. माझ्यासाठी प्रोडक्शन टीम कशी सर्व व्यवस्था करते आणि कुठे-कुठे जाऊन लोकेशन शोधून सर्व प्लॅन करते याचा विचार मी करत होतो. सगळी मेहनत तेव्हाच यशस्वी होते जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो आणि मला जयंतच्या भूमिकेसाठी पहिल्या दिवसापासून खूप छान प्रतिसाद मिळत आहे. सर्वाना जयंत आणि जान्हवीची जोडी प्रचंड आवडत आहे, आम्हाला सोशल मीडियावर मेसेजेस ही येतात. आमच्या 'लक्ष्मी निवास' मालिकेसाठी बस तुमची साथ अशीच लाभू दे.