जस्सी परतली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 12:42 IST
जस्सी जैसी कोई नही या मालिकेतील जस्सीचा लुक प्रेक्षकांना खूपच आवडला होता. हाच लुक प्रेक्षकांना पुन्हा एकदा थपकी प्यार ...
जस्सी परतली...
जस्सी जैसी कोई नही या मालिकेतील जस्सीचा लुक प्रेक्षकांना खूपच आवडला होता. हाच लुक प्रेक्षकांना पुन्हा एकदा थपकी प्यार की या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका आता दोन वर्षांचा लीप घेणार असून लीपनंतर थपकी एका नव्या रूपात पांडे व्हिलामध्ये परतणार आहे. ती वाणी ऑबेरॉय या नव्या नावाने घरात एंट्री करणार असून ती बदला घ्यायला येणार आहे. थपकी घरातून बाहेर पडल्यानंतर कोसी म्हणजेच स्मिता सिंग घरातल्या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवणार आहे. या नव्या लुकविषयी जिज्ञासा सिंग सांगते, "थपकी नेहमीच आपल्यावर आलेल्या सकटांचा सामना करणारी दाखवण्यात आली आहे. ती पुन्हा एकदा तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी येणार आहे. प्रेक्षकांना थपकीचा हा नवा लुक आवडेल अशी मला आशा आहे."