कलर्स वाहिनीवरील दिल से दिल तक या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जास्मीन भसीन काही दिवसांपूर्वी तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत आली होती. तिचे हे फोटोशूट बऱ्याच लोकांना आवडले. तिला वेस्टर्न आऊटफीट चांगले दिसतात. मात्र नुकतेच तिने एका पार्टीसाठी साडी नेसली होती.
अभिनेत्री जास्मीन भसीन साडीत अप्रतिम दिसत होती. तिने मरून रंगाची साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते. कमी मेकअप व डार्क लिपस्टिक लावली होती. मात्र ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. पार्टीमध्ये तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.