Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूरने दिली शाहरुख खानच्या 'या' प्रश्नांची अचूक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 06:00 IST

‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे

ठळक मुद्देजान्हवीला जुने चित्रपट खूप आवडतातगुरुदत्त हे तिचे सर्वात आवडते अभिनेते व दिग्दर्शक आहेत

स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमात तिने बॉलीवूडच्या काही जुन्या सौंदर्यवती  तारकांबाबच्या आपल्या उपस्थिता' छाप पाडली. या कार्यक्रमात जान्हवी कपूरला लक्ससाठी मॉडेलिंग केलेल्या काही जुन्या तारकांची छायाचित्रे दाखविण्यात आली आणि त्यांची नावे तिने ओळखून दाखवायची होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जान्हवीने सर्व जुन्या अभिनेत्रींची छायाचित्रे पाहून त्यांची नावे अचूक ओळखून दाखविली. त्यात निरुपा रॉय, प्रेमा नारायण, माला सिन्हा, परवीन बाबी, हेलन, जयाप्रदा वगैरे अभिनेत्रींचा समावेश होता. तिच्या या सुप्त गुणांनी तिने अन्य अभिनेत्रींवरही आपली छाप पाडली.

जान्हवीला जुने चित्रपट खूप आवडतात. गुरुदत्त हे तिचे सर्वात आवडते अभिनेते व दिग्दर्शक आहेत. एकाच भाषेच्या सिनेमात मला काम करायचे नाही आहे. त्यामुळे माझ्यासमोर विविध भाषांचे पर्याय खुले झाले आहेत. सुदैवाने स्टार किड असल्याने तिच्यासमोर निर्माते दिग्दर्शकांच्या निवडीचा प्रश्‍न फारच क्‍वचित येऊ शकतो. तिचे पप्पा बोनी कपूर यांनीही आपल्या लाडक्‍या कन्येसाठी भविष्यात चांगला सिनेमा प्रोड्युस करायचे ठरवले आहे. मात्र असे असले तरी आपली तुलना आई, श्रीदेवीबरोबर केली जाऊ नये, असे जान्हवीला वाटते.  

टॅग्स :जान्हवी कपूरस्टार प्लस