जयसिंग यशस्वी ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:01 IST
24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्येही जयसिंग राठोड वाईट लोकांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो कधीच आपल्या ...
जयसिंग यशस्वी ठरणार?
24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्येही जयसिंग राठोड वाईट लोकांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो कधीच आपल्या कर्तव्यात मागे राहात नाही. पण आता त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्याला संपूर्ण शहराला एका भयानक विषाणूच्या हल्ल्यापासून वाचवायचे आहे. तो विषाणू एका हॉटेलमध्ये सोडण्यात आलेला आहे. उर्वरित शहरात त्याचा प्रसार होऊ नये यासाठी जयसिंगला रोशन शेरचेनच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण या सगळ्यामध्ये जयला एक धक्का बसणार आहे. त्याचा मुलगा आणि त्याचा लाडका मित्र ग्यान यांनादेखील या विषाणूचा संसर्ग होणार आहे. जय या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मायादेखील त्याच्या समोर येणार आहे. जयसिंगला काहीही करून शहराला या विषाणूपासून वाचवायचे आहे. त्यासाठी तो काय काय करतो हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.