Join us

​जयसिंग राठोड इज बॅक़; ‘ ‘24’च्या Season 2चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 20:03 IST

आज बुधवारी ‘24’च्या दुसºया सीझनचा ट्रेलर आऊट झाला. लवकरच अनिल कपूर जयसिंग राठोड छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

सन २०१३ मध्ये अनिल कपूर ‘24’ हा टीव्ही शो घेऊन आलेत. ‘24’ला टेलिव्हिजनवर इतका भरभरून प्रतिसाद मिळेल, हे खुद्द अनिल कपूर यांनाही वाटले नव्हते. हा शो प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रेमापोटी अनिल कपूर या शोचे सेकंड सीझन घेऊन येत आहेत. आज बुधवारी ‘24’च्या दुसºया सीझनचा ट्रेलर आऊट झाला. लवकरच अनिल कपूर जयसिंग राठोड छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. एक जीवघेणा व्हायरस पसरवून मुुंबई धोक्यात घालू पाहणाºया शत्रूंशी जयसिंग राठोड लढताना दिसणार आहे. साक्षी तन्वर आणि सुरवीन चावला, आशिष विद्यार्थी तसेच सिकंदर खेर आदी या नव्या सीझनमध्ये आपल्याल दिसणार आहे. जयसिंगच्या आयुष्यात नवे प्रेम फुलतानाही आपण यात बघणार आहोत.मराठमोळी अमृता खानविलकरही  ‘24’च्या दुसºया सीझनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. याशिवाय अंगद बेदी, अनिता राज, हर्ष छाया, मधूरिमा तुली आदींच्या भूमिका आहेत. तेव्हा बघा तर  ‘24’च्या नव्या सीझनचा फस्ट लूक़..