Join us

Engaged : 'जय मल्हार' फेम सुरभी हांडेचा झाला साखरपुडा,दिसला रोमँटीक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:45 IST

खुद्द सुरभीनेच सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्युज दिली आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत अभिनेत्री सुरभी हांडेचाही उल्लेख करावा लागेल. नुकताच सुरभीचा दुर्गेश कुलकर्णीसोबत साखरपुडा पार पडला आहे. खुद्द सुरभीनेच सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्युज दिली आहे. फोटो शेअर करताच या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. तुर्तास आता साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. 

'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून सुरभी म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती. आता सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकत आहे.