‘जमाई राजा’त ‘FUN’jabi Chefचा नवा अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 17:31 IST
‘जमाई राजा’ या हिंदी मालिकेतील सिद्धार्थ अर्थात रवी दुबे म्हणजे एक बहुप्रतिभावान अभिनेता. ‘जमाई राजा’मध्ये या स्टाईलिश अॅक्टरने अनेक ...
‘जमाई राजा’त ‘FUN’jabi Chefचा नवा अवतार
‘जमाई राजा’ या हिंदी मालिकेतील सिद्धार्थ अर्थात रवी दुबे म्हणजे एक बहुप्रतिभावान अभिनेता. ‘जमाई राजा’मध्ये या स्टाईलिश अॅक्टरने अनेक अवतार घेतले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. आता रवी आणखी एका नव्या अवतारात दिसणार आहे. हा अवतार म्हणजे पंजाबी शेफ, तडका सिंग याचा. होय, तडका सिंग हे मजेशीर कॅरेक्टर मालिकेत दिसणार आहे. यापूर्वी या मालिकेत रवीने राजस्थानी लोककलाकार, रघु मॅकॅनिक, ज्योतिषी, महाराष्ट्रीय प्रौढ महिला ज्योती ताई, पठाण अशा व्यक्तिरेखा साकारल्या आणि प्रत्येक अवतारात तो अगदी चपखल बसला. आता रवी आपले १५ वे लूक मालिकेत ट्राय करतोय. हे म्हणजे पंजाबी शेफ तडका सिंग याचे. डोक्यावर पंजाबी पगडी, वाढलेली दाढी, लांब सदरा, रंगीत कोट आणि पंजाबी बाणा अशा अवतारात रवी पुन्हा एकदा जमला आहे. प्रत्येक अवतारासाठी रवीने बरीच मेहनत घेतली आहे. या लूकसाठी त्याने स्वत:चे काही पर्सनल सामान वापरले आहे. सध्या पंजाबी शेफ लूकसाठीही त्याने अशीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे, या लूकमधील पंजाबी अॅटिट्यूड स्वत:त आणण्यासाठी त्याला त्याच्या प्रेमळ पंजाबी बायकोने मदत केलीयं. होय, सरगुन मेहता हिने. तडका सिंगची भूमिका अधिकाधिक जिंवंत करण्यासाठी रवीने सरगुनकडून टीप्स घेतल्या आणि त्या वापरल्याही. एकाच मालिकेत इतके वेगवेगळे अवतार व व्यक्तिरेखा कशा काय साकारू शकतोस, असे विचारले असता रवी गोड हसतो आणि यामागचे गुपित सांगतो. एक कलाकार या नात्याने मी या मालिकेत साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे, याचा मला आनंद आहे. मी एक रचनात्मक व्यक्ति आहे. जेव्हा केव्हा मला काही वेगळे करण्याची संधी मिळते, ती संधी मी आव्हान म्हणून स्वीकारतो, हेच ‘जमाई राजा’तील माझ्या विविध अवतारामागचे खरे गुपित आहे, असे रवी सांगतो. माझ्या अनेक अवतारांप्रमाणेच तडका सिंगची भूमिका ही मी आव्हान म्हणून स्विकारली. या गेटअपमध्ये मी अगदी पंजाबी तडका सिंग भासावे, यासाठी मी बरीच मेहनत केली. सरगुनने मला काही टीप्स दिल्या. त्या मी वापरल्या. याशिवाय माझी सहअभिनेत्री अचिंत कौर हिनेही मला बरीच मदत केली. मला कामावर विश्वास आहे आणि त्यासाठी कष्ट उपसण्याची, नवे काही शिकण्याची माझी तयारी आहे. एकंदरीत तडका सिंगच्या भूमिकेतही मी माझा जीव ओतला आहे. प्रेक्षकांना मी या अवतारातही आवडेल, असा मला विश्वास आहे, असेही रवी म्हणाला.