Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ यांच्या कृपेने भक्ताला मिळणार जीवनदान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:15 IST

मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे, त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत, त्यांनी अनेक रूपं घेऊन भक्तांची मदत केली आहे.

भक्ताने पूर्ण श्रद्धेने, निर्मळ मनाने स्वामीं पुढे केलेली प्रार्थना वा मागणी कधी पूर्ण झाली नाही असे होत नाही. प्रत्यके अडीअडचणीच्या काळात स्वामी भक्ताला योग्य तो मार्ग दाखवतात आणि सुखरुप संकटातून बाहेर काढतात. स्वामी आपल्या भक्तांची कठीण परीक्षा देखील घेतात. मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे, त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत, त्यांनी अनेक रूपं घेऊन भक्तांची मदत केली आहे. “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपण अनुभवतोय, काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या कृपेची प्रचिती भक्तांना येतेच आहे. 

मालिकेमध्ये बहिरेशास्त्री नामक गृहस्थाच्या मोठ्या संकटात आले आहेत. त्यांच्या मुलाचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्यांना आपल्या मुलाला या मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढायचे आहे. त्यांच्या कानावर असं येतं कि, अक्कलकोट येथे गेलात तर स्वामी समर्थ यांच्या कृपेने आलेलं संकट दूर होईल.अक्कलकोट येथे आल्यावर त्यांची भेट अर्थात सुंदराबाई सोबत होते. सुंदराबाई याच गोष्टीचा फायदा घ्यायला बघतात आणि स्वामींपर्यंत पोहचायचे असेल तर मीच तुम्हांला मदत करू शकते असं बहिरेशास्त्री यांना सांगते. 

पण, काही केल्या त्यांची भेट स्वामींशी होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना खूप चिंता होऊ लागते. मेघ:श्याम म्हणजे त्यांच्या मुलाकडे अवघा एक महिना आहे. असं काय घडतं कि स्वामी आणि मेघ:श्याम यांची भेट घडून येते.स्वामी त्याची इच्छा पूर्ण करतात आणि तिथूनच त्या दोघांची गट्टी जमते.आता स्वामी त्याला मृत्यूच्या छायेतुन कसं बाहेर काढणार ? कसं भक्ताला जीवनदान मिळणार ? सुंदराबाईला स्वामी कसा धडा शिकवणार ? मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.