Join us
Daily Top 2Weekly Top 5

'थोडी तरी लाज शिल्लक असेल ना तर...'; जान्हवीने निक्कीला डिवचलं, घरातलं वातावरण पुन्हा तापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:58 IST

बिग बॉस मराठीच्या घरात आज जान्हवी-निक्कीमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद पाहायला मिळतोय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रत्येक दिवशी घरात नवीन वाद निर्माण होताना दिसतोय. एकमेकांच्या जिगरी मैत्रिणी असणाऱ्या जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसतेय. दोघींही एकमेकांना बोलण्याची एक संधी सोडत नाहीत. जान्हवी-निक्कीमध्ये आज पुन्हा एकदा मोठा वाद रंगताना दिसणार आहे. जान्हवीने निक्कीला चांगलंच डिवचलं असून दोघींमध्ये वादाची ठिणगी उडताना दिसणार आहे.

जान्हवी निक्कीला दिलं चॅलेंज

बिग बॉस मराठीच्या घरात आज भांड्याला भांड लागणार आहे. निक्की आणि जान्हवीमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद होणार आहे. निक्कीने घरातील ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संपूर्ण घरालाच तिचा प्रचंड राग आलेला आहे. बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणत आहे,”तुला थोडी तरी लाज वाटत असेल तर मी जेवण बनवलेलं तू जेवणार नाहीस.” तर निक्की म्हणत आहे,”माझ्या वाकड्यात गेलं तर मी गळाच पकडत असते”. 

जान्हवी-निक्कीमध्ये मोठा वाद

जान्हवी निक्कीला निर्लज्ज म्हणते. तर  निक्की शेवटी म्हणते की,  तुमच्या सगळ्यांच्या छातीवर बसेन नी. अशाप्रकारे निक्की आणि जान्हवी आज काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोघींच्या वादामुळे घरातलं वातावरणं तापलेलं दिसलं. आता या वादाचा शेवट कसा होणार, हे पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळेलच. याशिवाय रितेशभाऊ या दोघींना कसं सुनावणार, याकडेही सर्वांचं लक्ष आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनकलर्स मराठी