झलक दिखला जा या कार्यक्रमात सध्या जॅकलिन फर्नांडिस आणि गणेश हेगडे परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. जॅकलिन एक खूप चांगली डान्सर असून मला तिला नृत्य शिकवायला आवडेल असे गणेश सांगतो. गणेशने आतापर्यंत अनेक बॉलिवुडच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे. पण जॅकलिनला नृत्य शिकवण्याची त्याला संधी मिळाली नाही. तो सांगतो, "जॅकलिनच्या एका चित्रपट मी कोरिओग्राफी करणार होतो. पण काही कारणास्तव ते घडू शकले नाही. पुढील काळात तिच्या चित्रपटात कोरिओग्राफी करण्याची माझी इच्छा आहे."
गणेशला नाचवाचेय जॅकलिनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:27 IST